Sonu Sood On BMC: महापालिकेच्या वर्तवणूकीमुळे अभिनेता सोनू सूद त्रस्त, 'या' प्रकरणी ट्विट करत अप्रत्यक्षपणे दर्शवली नाराजी
Sonu Sood (PC - Facebook)

Sonu Sood On BMC:  कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या मदतीला धावलेला अभिनेता सोनू सूद सध्या मुंबई महापालिकेकडून त्याच्यासोबत करण्यात येणाऱ्या वर्तवणूकीबद्दल त्रस्त आहे. कारण महापालिकेने सोनू सूद याच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप लावला आहे. याच कारणास्तव आता सोनू सूद याने सोशल मीडियात अप्रत्यक्ष पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.(Top Global Asian Celebrity 2020: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे)

सोनू सूद याने ट्विट करत असे म्हटले आहे की, ही गोष्ट जगाची आहे की एखादा जर चांगला आहे तर तो का आहे.(Sonu Sood Meet Sharad Pawar: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने घेतली शरद पवार यांची भेट)

Tweet:

मंगळवारी सुद्धा सोनूने ट्विटमध्ये असे लिहिले होते की, कोणाचीही मदत करण्यासाठी मुहूर्त नव्हता आणि तो कधीच नसणार आहे. आता नाही तर कधीच नाही.(BMC Files Complaint Against Sonu Sood: सोनू सूदच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल, रहिवाशी इमारतीचे अनधिकृत पद्धतीने हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा ठपका)

Tweet:

तर महापालिकेने सोनू सूद याच्यावर परवानगी शिवाय 6 मजली रहिवाशी इमारतीचे कथित रुपात हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप लावला आहे. याच प्रकरणी मुंबई महापालिकेने 7 जानेवारीला पोलिसात तक्रार दाखल केली होती. महापालिकेने गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात सोनू सूद याला एक नोटीस पाठवली होती. त्याच नोटीसला सोनू सूद याने डिसेंबर 2020 मध्ये दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. परंतु कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली.

त्यानंतर सोनू सूद याने या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. बॉम्बे हायकोर्टाने यावर सुनावणी करत 13 जानेवारी पर्यंत सोनू सूदच्या इमारतीवर महापालिकेकडून कारवाई स्थगित करण्यात आली होती.

दुसऱ्या बाजूला हायकोर्टाने महापालिकेला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे म्हटले होते. त्यानुसार प्रतिज्ञापत्र महापालिकेने दाखल करत असे म्हटले की. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद Habitual Offender आहे. तर आज सोनू सूद याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट सुद्धा महापालिकेने केलेल्या कारवाईच्या दृष्टीकोनातून पाहिली जात आहे.