BMC Files Complaint Against Sonu Sood: सोनू सूदच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल, रहिवाशी इमारतीचे अनधिकृत पद्धतीने हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा ठपका
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

BMC Files Complaint Against Sonu Sood: अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. तर सोनू सूद याने जुहू येथील सहा मजली रहिवाशी इमारतीचे अनधिकृत पद्धतीने हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा ठपका त्याच्यावर लावण्यात आला आहे. महापालिकेने असे ही म्हटले आहे की, सोनू सूद याने या गोष्टीसाठी परवानगी सुद्धा मागितली नव्हती. मुंबई महापालिकेने सोनू सूद विरोधात पोलिसात 4 जानेवारीला तक्रार दाखल केली. त्यावेळी असे सांगण्यात आले की, जुहू येथील शक्ती नगर या सहा मजली रहिवाशी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केले. यासाठी त्याने परवानगी ही घेतली नव्हती असे टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, जुहू पोलिसांनी अभिनेता सोनू सूद याने MRTP कायद्याचे उल्लंघन केल्याने तक्रार दाखल केली आहे. पण यावर सोनू सूद याने आक्षेप घेत म्हटले की, यामध्ये कोणतीही अनियमितता नाही आहे. त्याने महापालिकेचे परवानगी घेतली होती पण त्या संदर्भात कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून शिक्कामोर्तब होणे बाकी होते. ऑक्टोबर 2020 मध्ये दबंग चित्रपटातील अभिनेत्याने बीएमसीने पाठविलेल्या नोटीसविरोधात शहरातील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्याला कोणताही अंतरिम दिलासा मिळाला नाही, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.(BMC: अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय? घ्या जाणून) 

कोर्टाने सूदला उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला होता. वेळ निघून गेली परंतु मंजूर योजनेनुसार त्यांनी केलेले बदल याबद्दल सांगितले नसल्याचे असे एका नागरी अधिकाऱ्याने प्रकाशनाला म्हटले. त्यामुळे एमआरटीपी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यासाठी पोलिस तक्रार दाखल केली आहे, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. तर सोनू सूद याने असे म्हटले की, त्याने यासाठी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतली होती. हा विषय MCZMA संदर्भातील परवानगी देण्याचा आहे. पण कोरोना व्हायरसच्या कारणामुळे परवानगी संदर्भातील निर्णय आला नाही. त्यामुळे यामध्ये कोणतीही अनियमितता नाही.

कोरोना व्हायरसच्या काळात हे हॉटेल कोविड योद्धांसाठी वापरले गेले. त्यामुळे जर परवानगी दिली गेली नाही तर त्याचे पुन्हा रहिवासी इमारतीत रुपांत केले जाईल असे ही सोनू सूद याने म्हटले आहे.