Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात; मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल
Sonakshi-Zaheer (PC - Instagram)

Sonakshi-Zaheer Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती लवकरच तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि चित्रपट अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) सोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. याआधी या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन (Pre-Wedding Function) सुरू झाले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या मेहंदी सोहळ्याचे ताजे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. ज्यामध्ये वधू-वरांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो व्हायरल -

सोनाक्षी सिन्हाचा प्री-वेडिंग फंक्शन 21 जून म्हणजेच शुक्रवारपासून सुरू झाले आहेत. तिने मेहंदी समारंभाची सुरुवात केली असून अभिनेत्रीने तिच्या हातावर झहीर इक्बालच्या नावाने मेहंदीही लावली आहे. या सोहळ्याचे फोटो सोनाक्षी आणि झहीरचा जवळचा मित्र जफर अली मुन्शी याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (हेही वाचा -Sonakshi Sinha To Marry Boyfriend Zaheer: सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्न बंधनात, मुंबईतील हॉटेलमध्ये पार पडणार कार्यक्रम)

या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर मेहंदी सोहळ्याला उपस्थित असलेल्या त्यांच्या सर्व मित्र आणि जवळच्या लोकांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. याशिवाय, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्रांनीही हाताला मेंदी लावली. ज्याचा अंदाज तुम्ही हे चित्र पाहून लावू शकता.

Sonakshi-Zaheer Mehendi Photos (PC - Instagram)
Sonakshi-Zaheer Mehendi Photos (PC - Instagram)

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचा भव्य सोहळा मुंबईत आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम सिनेतारक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 23 जून ही ही जोडी लग्न करणार आहे.