Sonakshi Sinha To Marry Boyfriend Zaheer: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (36) तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ती लग्न करणार आहे. तिचा बॉयफ्रेंड झहीर इकबाल सोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षापासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर एकमेकांना डेट करणार होते. मुंबईत येत्या २३ जून रोजी लग्न करणार आहे. हिरामंडी या वेब सिरीजमध्ये सोनाक्षीने जबरदस्त अॅक्टींग केली होती. त्यामुळे ती काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होती. (हेही वाचा- अभिनेत्री अमृता रावचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन; जॉली एलएलबी 3 चित्रपटात साकारणार अर्शद वारसीच्या पत्नीची भुमीका)
मिळालेल्या माहितीनुसार, 13 दिवसांनी सोनाक्षी सिन्हाचा लग्न सोहळा मुंबई पार पडणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बास्टीयन हॉटेलमध्ये लग्न कार्यक्रम असणार आहे. लग्नात सोनाक्षी सिन्हाचा पूर्व कुटुंब आणि तीचे जवळचे मित्र मैत्रिणी हजेरी लावणार आहे. त्याचबरोबार हिरामंडी या वेब सिरीजची संपूर्ण टीम लग्नात सहभागी होणार आहे.
View this post on Instagram
वृत्त पत्राच्या अहवालानुसार, सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वेगळ्या पध्दतीने डिझाइन करण्यात आळी आहे. पत्रिकेच्या पहिल्या पानावर 'अफवा खऱ्या आहेत' असं लिहिलं आहे. तसेच येणाऱ्या पाहुण्यांना फॉर्मल्स ड्रेस कोड सांगितला आहे. सोनाक्षी आणि झहिर या दोघाचे हटके फोटोशुट नेहमी चर्चेत राहतात.