Singer Lucky Ali Accused IAS Officer: गायक लकी अलीची आयएएस अधिकाऱ्याविरोधात तक्रार; जमीन बळकावल्याचा केला आरोप
Singer Lucky Ali (PC - Facebook)

Singer Lucky Ali Accused IAS Officer: बॉलीवूड गायक लकी अली (Singer Lucky Ali० ने भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS Officer) रोहिणी सिंधुरी ( Rohini Sindhuri), त्यांचा पती आणि दिरावर जमीन बळकावल्याचा (Land Grabbing Case) आरोप करत कर्नाटक लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. गायकाने त्याच्या अधिकृत X हँडलवर या प्रकाराची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये, गायकाने सर्व कथित आरोपींची नावे दिली. अलीच्या म्हणण्यानुसार, सिंधुरी, तिचा नवरा आणि तिच्या दिराने जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसा वापरला आहे.

लकी अली यांनी त्याच्या जमिनीवर दुसऱ्यांदा अवैध कब्जा केल्याचा आरोप केला आहे. याआधी डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या डीजीपीला टॅग करत अनेक ट्विट केले होते. या ट्विटर थ्रेडमध्ये त्यांनी म्हटले होते की, त्यांचे शेत, जी ट्रस्टची मालमत्ता आहे. ती बेंगळुरू भूमाफिया मधु रेड्डी आणि सुधीन रेड्डी, आयएएस सिंदुरी यांनी ताब्यात घेतली आहे. (हेही वाचा - Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात; मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल)

तथापी, आयएएस अधिकारी रोहिणी सिंदुरी कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी डी रूपा मुदगील यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुदगील यांनी फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. या पोस्टमध्ये मुदगील यांनी आरोप केला होता की, सिंदूरीने त्यांचे वैयक्तिक फोटो सहकारी आयएएस अधिकाऱ्यांसोबत शेअर केले होते. यावरून दोघींमध्ये वाद झाला. परिणामी राज्य सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. (हेही वाचा -Anupam Kher's Office Robbed: अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी; लेखा विभागाची तिजोरी आणि चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्स चोरट्यांनी काढला पळ)

दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी सिंदुरीने मुदगील यांना कायदेशीर नोटीस बजावून बिनशर्त माफी मागावी आणि त्यांच्या प्रतिष्ठेला आणि मानसिक त्रासासाठी 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर, 24 मार्च रोजी बेंगळुरूच्या कोर्टाने सिंदुरीच्या अपीलवर रूपाविरूद्ध फौजदारी मानहानीचा खटला नोंदवण्याचे आदेश दिले होते. परंतु न्यायालयाने 21 ऑगस्ट रोजी त्यांची याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मुदगील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अद्याप हा खटला प्रलंबित आहे.