Anupam Kher's Office Robbed: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी झाली आहे. कार्यालयातील लेखा विभागातील तिजोरी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्सही त्यांनी सोबत नेला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे ऑटोमध्ये बसताना दिसत आहेत. याप्रकरणी अनुपम खेर यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनुपम खेर यांनी X वर एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसमध्ये काल रात्री (बुधवार) दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडले आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमधील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित ते फोडू शकले नाहीत) आणि एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्स घेऊन गेले. आमच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला आहे आणि पोलिसांनी आश्वासन दिले आहे की चोर लवकरच पकडले जातील. ईश्वर या चोरांना सद्बुद्धी देवो!’ (हेही वाचा: Abhishek Bachchan ला घरपोच मिळाली 'जगातली सर्वोत्तम मिसळ'; Swiggy साठी शेअर केली खास पोस्ट)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)