Jacqueline Carrieri Dies: सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? विशेषतः फिल्मी दुनियेत सुंदर दिसणे ही सर्वात मोठी अट असते. अनेक स्टार्स ग्लॅमरस आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करतात. या सगळ्या दरम्यान हॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाची माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री जॅकलिन कॅरीरी हिचे वयाच्या 48 व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीमुळे निधन झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध अर्जेंटिनाची अभिनेत्री जॅकलिन कॅरीरी यांचे निधन झाले आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाच्या दुनियेत जॅकलिन एक प्रसिद्ध चेहरा होती. पण सुंदर दिसण्यासाठी तिने वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. (हेही वाचा - Nushrratt Bharuccha Stuck In Israel: अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; टीमने सांगितलं, संपर्क होऊ शकला नाही)
Actress-beauty queen Jacqueline Carrieri dies at 48 due to plastic surgery
Argentinian actress died from blood clot during the intervention processhttps://t.co/5iClMG2Kmf
— Gulf News (@gulf_news) October 6, 2023
रिपोर्ट्सनुसार, जॅकलीन कॅरीरीचे वयाच्या 48 व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीमुळे कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचे कारण कॉस्मेटिक सर्जरी प्रक्रियेदरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे सांगितले जाते. जॅकलिनच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी तिची मुले क्लो आणि ज्युलियन त्यांच्या आईसोबत होते.