अभिनेता शाहिद कपूर याला कर्करोग? चाहत्यांना धक्का; कुटुंबीयांकडून तातडीने खुलासा
Shahid Kapoor (Photo courtesy: Facebook)

गेल्या काही काळापासून बॉलीवुडमधील काही अभिनेते, अभिनेत्री कर्करोगासारख्या दूर्धर आजाराने त्रस्त आहे. नुकत्याच अभिनेता इरफान खान ( Actor Irrfan Khan), अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Actress Sonali Bendre) यांनाही कर्करोग (Cancer) झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दोघांबाबात हे वृत्त खरे असले तरी, बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला कर्करोग झाल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. मात्र, या अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळले आहे. शाहिद कपूर (Shahid Kapoor ) असे या अभिनेत्याचे नाव आहे. शाहिद याला पोटाचा कर्करोग ( Stomach Cancer)झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येताच त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने खुलासा केला. शाहीदला असा कोणताही आजार झालेला नसून, त्याची प्रकृती ठणठणीत आहे. खरेतर अशा बातम्या येतातच कोठून? अशा अफवा पसरवून लोकांना काय मिळते हेच कळत नाही, असा संतप्त सवालही शाहिदच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

बॉलीवुडशी संबंधीत बातम्या देणाऱ्या पीपिंगमून नावाच्या वेबसाइटने शाहिदचे नाव न घेता त्याच्या आजाराबाबत वृत्त दिले होते. या वृत्तात एका 37 वर्षीय अभिनेत्याला पोटाचा कर्करोग झाला असून, तो प्राथमिक अवस्थेत आहे. तसेच, त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रियाही झाली असल्याचे म्हटले होते . दरम्यान, एबीपी न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, त्यांच्या प्रतिनिधिने शाहिद कपूर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तेव्हा कुटुंबातील एका सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, काही लोक शाहिदबाबत वृत्त देत आहेत. पण, हे लोक काहीही वृत्त देत आहेत. हे वृत्त म्हणजे एक अफवा आहे. या अफवेलासद्धा कोणाताही आधार नाही. प्रसारमाध्यमांनी असे खोडसाळ वृत् देऊ नये.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार शाहिदची मॅनेजर अकांक्षानेही हे वृत्त फेटाळून लावले आहे. मॅनेजरने सांगितले की, शाहिद कपूर काही खासगी कामासाठी दिल्लीला गेला आहे. काम आटोपल्यावर दोन दिवसांनी तो परत मुंबईला परतणार आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीविषयी आलेल्या सर्व बातम्या निराधार आहेत. (हेही वाचा, Pregnancy च्या बातम्यांवर अनुष्का शर्माचा खुलासा)

दरम्यान, बॉलीवुडविषयी बातम्या देणारी वेबसाईट ब्लाइंड आइटम डॉट कॉमने शाहिदचा नामोल्लेख टाळत त्याला कर्करोग झाला असल्याचे वृत्त दिले होते. दरम्यान, या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली. शाहिदच्या कुटुंबीयांकडे त्याच्याबाबतच्या वृत्तामुळे सातत्याने होऊ लागलेल्या चौकशीमुळे त्याचे कुटुंबीयही वैतागले आहेत.