Pregnancy च्या बातम्यांवर अनुष्का शर्माचा खुलासा
विराट कोहली , अनुष्का शर्मा (Photo Credits: Twitter)

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  आणि विराट कोहली (Virat Kohali) वर्ष भरापूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. येत्या 11 डिसेंबरला अनुष्का आणि विराट ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मात्र दरम्यान अनुष्का गरोदर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये झपाट्याने पसरत आहे. सध्या झिरो (Zero) या अनुष्का शर्माच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या गरोदरपणावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस या निव्वळ अफवा असल्याचं सांगत या चर्चांना सध्या पूर्णविराम लावला आहे.

अनुष्का शर्माला जेव्हा गरोदरपणाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अनुष्का म्हणाली, " विराट आणि मी दोघंही सध्या आमच्या कामामध्ये व्यग्र आहोत. आम्हांला सध्या ऐकमेकांना देण्यासाठी वेळ नाही" असे म्हणत गरोदरपणाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. "सेलिब्रिटींबद्दल असं वारंवार लिहलं जातं, लग्न तुम्ही लपवू शकता पण गरोदरपणाच्या बातम्या लपवणं शक्य नाही. आज नाकारली तरीही काही महिन्यांनी ती गोष्ट जगासमोर येते. या टप्प्यातून प्रत्येकालाच जावं लागत. मीडियामध्ये जेव्हा अशा बातम्या येतात तेव्हा मी त्या हसून टाळते " असं अनुष्का म्हणाली. Virushka Anniversary: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियात !

अनुष्का शर्मा सध्या झिरो (Zero) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा, शाहरुख खान सोबत मुख्य भूमिकेत अनुष्का झळकणार आहे.झिरो मध्ये अनुष्का एका दिव्यांग वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 11 डिंसेबर 2017 दिवशी विराट आणि अनुष्का गुपचूप इटलीमध्ये विवाह बंधनात अडकले. यंदा लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघासोबत विराट असल्याने तेथेच अनुष्का जाऊन सेलिब्रेशन करणार असल्याची चर्चा आहे.