Virushka Anniversary: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियात !
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credits : Instagram)

Virushka Anniversary: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा विवाहसोहळा 11 डिसेंबर, 2017 ला इटलीत पार पडला. या दोघांच्या सिक्रेट वेडींगला पुढील महिन्यात 1 वर्ष पूर्ण होणार आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस (Marriage Anniversary) स्पेशल करण्यासाठी या सेलिब्रेटी कपलने खास प्लॅन केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट-अनुष्का, ऑस्ट्रेलियात (Australia) हा खास दिवस सेलिब्रेट करणार आहेत.

अनुष्का शर्मा सध्या झीरो (Zero) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र लवकरच ती आपले काम संपवून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत अनुष्काचा आगामी सिनेमा झीरो (Zero) 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विराट-अनुष्का नेहमीच आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे अनेकदा एकमेकांसोबत अधिक वेळ घालवता येत नाही. त्यामुळे लग्नच्या पहिल्या वाढदिवसाचे निमित्त साधत विरुष्काने ऑस्ट्रेलिया ट्रिपचा प्लॅन केला आहे.

विराट सध्या ऑस्ट्रेलियातच असून अनुष्का लवकरच आपले काम संपवून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.