अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) गुरुवारी शाहिद कपूरची (Shahid Kapoor) प्रमुख भूमिका असलेल्या ओरिजिनल सीरिजअंतर्गत आगामी वेब सीरिजचे प्रोडक्शन सुरु करण्याची घोषणा केली. ही सिरीज एक थ्रिलर असून ती राज निदिमोरू (Raj Nidimoru) आणि कृष्णा डीके (Krishna DK) तयार करत आहेत. अभिनेता शाहिद कपूर या सिरीजद्वारे डिजिटल डेब्यू करत आहे. या वेब सिरीजचे नाव अद्याप निश्चित झाले नाही. याआधी राज आणि डीके यांनी 'द फॅमिली मॅन’ शो बनवला होता. आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल शाहिद कपूर म्हणाला, मी खूप काळापासून राज आणि डीके यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होतो व आता ती संधी मिळत आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील 'द फॅमिली मॅन’ शो हा आपल्या आवडत्या शोपैकी एक असल्याचेही शाहीदने सांगितले. या वेळी निर्माता युगल राज आणि डीके म्हणाले की, 'प्रत्येक चित्रपट किंवा सिरीजद्वारे काही चांगले देणे हेच आमच्यासाठी आव्हान होते. ही आमची आवडती स्क्रिप्ट आहे आणि प्रत्यक्षात लेबर ऑफ लव्ह होती. आम्हाला शाहिदद्वारे एक परिपूर्ण अभिनेता मिळाला तो या मालिकेसाठी नेहमीच आमची पहिली निवड होता.' लवकरच मालिकेत आणखी एका सरप्राईज कास्टची घोषणा केली जाईल. (हेही वाचा: Diljit Dosanjh सोबत 'Honsla Rakh' चित्रपटात दिसणार Shehnaaz Gill; पहा चित्रपटाचे खास Poster)
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारचा पृथ्वीराज आणि शाहिद कपूरचा जर्सी यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार आहे. यावर्षी दिवाळीच्यावेळी एकच दिवशी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'जर्सी' ही अशा व्यक्तीची कहाणी आहे जो खूपच हुशार आहे पण एक अयशस्वी क्रिकेटपटू आहे. हा चित्रपट जर्सी या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.