Shah Rukh Khan (Photo Credits: Twitter)

Shah Rukh Khan Photos Leaked from Pathan Sets in UAE: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या दुबईत आगामी सिनेमा पठाण चे शूटिंग करत आहे. या सिनेमाच्या सेटवरुन फोटोज आणि व्हिडिओज लीक झाले आहेत. यात शाहरुख खान चालत्या गाडीच्या छतावर बसलेला दिसत आहेत. यावरुन ते अॅक्शन सीनसाठी शूट करत असल्याचे दिसून येते. लीक झालेले फोटोज इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले असून चाहत्यांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. (Pathan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि जॉन अब्राहम 'पठाण’ चित्रपटात एकत्र झळकणार)

शाहरुखच्या फॅन क्लबने दुबईतील हे फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत. यात शाहरुख आपल्या एका चाहत्यासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. दरम्यान, पठाण सिनेमाचे शूटिंग जोरदार सुरु असल्याचे इंटरनेटवरुन समोर आलेल्या फोटोज आणि व्हिडिओजमधून दिसून येते.

पहा फोटोज:

फेब्रुवारी महिन्यात या सिनेमाचे हाय अॅक्शन सीन्स शूट करण्यात येणार आहेत. यशराज फिल्म्स निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. 2018 मध्ये आलेल्या झिरो सिनेमाच्या 2 वर्षानंतर शाहरुख खान पठाण सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पठाण सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. यात शाहरुख-दीपिका रॉ एजेंट ची भूमिका साकारणार असून डिंपल कपाडिया या एजेन्सीच्या प्रमुख म्हणून समोर येणार आहेत. या सिनेमात जॉन अब्राहम निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे.