सारा अली खान आणि आई अमृता सिंग यांनी जुहूच्या मंदिरात घेतले शनी देवाचे दर्शन; पहा फोटो
Sara Ali Khan with her mother (Photo Credits: Yogen Shah)

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासह परदेशात आपलं व्हेकेशन एन्जॉय करून आल्यावर, अभिनेत्री सारा अली खान आता मात्र आपल्या कुटुंबियांना वेळ देताना दिसत आहे. ती नुकतीच आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत, तिच्या आईला म्हणजेच अमृता सिंग यांना वेळ देताना दिसत आहे.

आज जुहू येथील प्रसिद्ध शनी मंदिरात सारा अली खान तिच्या आई अमृता सिंग सोबत दिसली आहे. सारा आपल्या आईसोबत भारतीय पेहेरावात मंदिरात जाताना दिसली. अमृता यांनी सूती पंजाबी पोशाख परिधान केला होता तर सारा तिच्या पांढऱ्या शारारा सूटमध्ये खूपच शोभून दिसत होती.

देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत असताना सरांचे फोटो काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तिथे उपस्थित लोकांचे साराने लक्ष वेधून घेतले. गाडीमध्ये बसत असताना, साराने मंदिराच्या बाहेर बसलेल्या एका गरीब माणसाला पैसे देऊन मदत केली.

पहा हा फोटो

Sara Ali Khan (Photo Credits: Yogen Shah)

पहा Sara Ali Khan ची अजब फॅशन; जीन्सची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, व्यावसायिक दृष्ट्र्या पाहता, सारा लवकरच डेव्हिड धवन यांच्या 'कुली नंबर 1' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवन यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याचसोबत ती इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज काल' मध्ये दिसणार आहे. त्यात ती कार्तिक आर्यन सोबत काम करत आहे.