पहा Sara Ali Khan ची अजब फॅशन; जीन्सची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Sara Ali Khan (Photo Credits: Yogen Shah)

सेलिब्रिटी नेहमीच आपापले फॅशन स्टेटमेंट सेट करत असतात. मग त्यात रणवीरच्या कपड्यांची अजब स्टाईल असो वा एखाद्या ऍक्ट्रेसचा एअरपोर्ट लुक असो. याच फॅशनला सामान्य नागरिक फॉलो करतात आणि मग बनतो तो एक ट्रेंड.

बॉलीवूडमधील जवळपास सर्वच अभिनेत्री या फॅशनीस्टा आहेत पण त्यातही प्रामुख्याने जिची फॅशन सर्वात जास्त गाजते ती म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.

सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्या आधीपासूनच ती सोशल मीडियावर प्रसिद्ध होती, आणि ते म्हणजे तिच्या हटके फॅशन सेन्समुळे. आताही तिने घातलेल्या अजब जीन्समुळे तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ करत आहे.

पण त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे या जीन्सची किंमत. साराने फोटोमध्ये घातलेल्या या एका जीन्सची किंमत आहे तब्बल 2 लाख रुपये. या जीन्सला 'रिप्ड जीन्स' असं म्हटलं जातं. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.

पुन्हा एकदा ट्रेंडींग होत आहे 90 च्या दशकातील ही फॅशन; आजही बॉलिवूडच्या तारकांना पाडतेय भुरळ

साराचं अभिनयातील करियर बघता तिने 'केदारनाथ' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'सिम्बा' चित्रपट देखील झळकली व लवकरच तिचा 'लव आज कल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कार्तिक आर्यनसोबत ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी करत आहे.