
दिवसागणिक फॅशन ट्रेंड्स (Fashion Trends) बदलत आहेत. नवनवीन डिझायनर्स वेगवेगळ्या गोष्टींचा रेफरन्स वापरून सतत काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी जुन्या काळातील काही ट्रेंड्सचाही वापर होत असलेला दिसून येतो. सध्या बॉलिवूडमध्ये अशीच 90 च्या दशकातील एक अतिशय लोकप्रिय फॅशन डोके वर काढत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून अनेक तरूणी हा फॅशन ट्रेंड् फॉलो करतानाही दिसत आहेत. तर ही फॅशन आहे सॅटिन ड्रेसेसची (Satin Dress).
देसी गर्ल जितकी तिच्या हॉलिवूडचे पदार्पण आणि रिलेशनशीपमुळे चर्चेत असते तितकीच चर्चा तिच्या फॅशनचीही होते. काही दिवसांपूर्वी प्रियंका बेल स्लिव्सच्या ग्रीन कलरच्या सॅटिन टॉपमध्ये दिसून आली. जो तिने मॅचिंग कलरच्या शियर फॅब्रिकच्या फ्लेयर्ड पॅन्टसोबत घातला होता. प्रियंकाचा हा हटके लूक तिच्या बऱ्याच चाहत्यांना भावला. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रियंका याधीही सॅटिन ड्रेसमध्ये दिसून आली आहे.
प्रियंकासोबत करीनालाही या ट्रेंडने भूरळ घातलेली दिसते. नुकतीच करीना तिच्या सॅटिनच्या आउटफीटमध्ये दिसून आली. तसेच काही दिवसांपूर्वी ऑलिव्ह रंगाच्या सॅटिन टॉपमधीलही करिनाचे फोटो व्हायरल झाले होते.
बिगब्रदर विजेती शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या लूकसोबत नवीन प्रयोग करत असते. नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये दिसणारी शिल्पा नुकतीच ऑफ वाइट कलरचा सॅटिन व्हाइट सूटमध्ये दिसून आली. यावेळी शिल्पाने फॉर्मल पॅन्ट सूटसोबत हा एक नवीन एक्सपरिमेंट केला होता, ज्या लूकमुळे शिल्पा फारच क्लासी दिसत होती.
छोट्या पडद्यावर नागीणच्या रूपाने घराघरात पोहोचलेली मौनी रॉय सध्या चर्चेत आहे तिचा नवीन चित्रपट आणि स्टायलिश लूकमुळे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच मौनी तिच्या यलो कलरच्या एसीमिट्रिकल सॅटिन ड्रेसमध्ये दिसून आली. सॅटिन ड्रेसमुळे लाभलेला मौनीचा बोल्ड अंदाज आणि हा लूक सध्या एक चर्चेचा विषय ठरत आहे. (हेही वाचा: पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून कशी घ्याल त्यांची काळजी)
या ताराकांसोबत बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विविध पार्टी, फिल्म फेस्टिवल आठव अवॉर्ड फंक्शनमध्ये सॅटिनच्या कपड्यांत दिसून आल्या आहेत. या फॅशनमुळे तुम्हाला एकाच वेळी बोल्ड आणि क्लासी लुक प्राप्त होतो.