आपल्या दागिन्यांना जिवापाड जपणा-या महिलांना किंवा तरुणींना ब-याचदा पावसाळ्यात दागिने काळे पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. किंबहुना पावसाळ्यात वातावरणात आलेल्या गारव्यामुळे दागिने (Jewellery) काळे पडण्याची चिंता सतावत असते. तसेच खोटे दागिने पावसाळ्यात खोटे दागिने काळे पडतात, तर चांदीच्या दागिन्यांची चमक थोडी कमी होते. यावर सर्वात मोठा रामबाण उपाय म्हणजे दागिने व्यवस्थित कपाटात ठेवणे. पण अनेकदा कामाच्या गडबडीत महिलांकडे तसे होते.
आजकाल कॉलेज तरुणींमध्येही खोट्या दागिन्यांचे फॅड वाढत चालले आहे. बाजारात तशी अँटिक ज्वेलरीही उपलब्ध आहे. त्यामुळे दागिन्यांची कशी काळजी घेता येईल यासाठी आम्ही तुम्हाला 5 सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
1. सोने किंवा प्लॅटिनमचे पावसाळ्यात काळे पडत नाही. पावसाळ्यात खोट्या दागिन्याबरोबर चांदीचे दागिने काळे पडल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा आणि त्यात दागिने थोडा वेळ ठेवा. थोड्या वेळात पाण्यातून दागिने बाहेर काढून ते साफ करा. तुमचे दागिने तुम्हाला पुन्हा चमकताना दिसतील.
2. खोटे दागिने कपड्यात गुंडाळून ठेवण्यापेक्षा ते कापसात गुंडाळून ठेवले तर ते काळे पडत नाही. तसेच जर तुम्ही ज्वेलरी बॉक्स मध्ये तुमचे दागिने ठेवत असला तर त्यात सिलिकाचे एक पॅकेट ठेवा. सिलिकाचे पॅकेटमध्ये दागिन्यांवर आलेला ओलावा निघून जातो आणि त्यामुळे दागिने खराब सुद्धा होत नाही.
3. जर तुमच्याकडे सिलिकाचे पॅकेट नसेल तर घरातील सूती कपड्यामध्ये तुम्ही दागिने ठेवू शकता. सूती कपडा दागिन्यावरील ओलावर शोषून घेतो.
हेही वाचा- पावसाळयात सहलीचा प्लॅन करत असाल तर मुंबई जवळचे 'हे' पाच धबधबे आहेत भन्नाट पर्याय (See Photos)
4. दागिने काळे पडत असतील तर त्यांना गरम पाण्यात टाकून साफ करा आणि त्यानंतर कॉटन च्या कपड्याने पुसा. मग थोडा वेळा त्या दागिन्यांना खुल्या हवेत सुकू द्या. हे दागिने एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा.
5. वापरात नसलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या आणि काळ्या पडलेल्या दागिन्यांवर घासा. नंतर थंड पाण्याने धुवा. तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील.
या सर्व उपायांनी तुमच्या दागिन्यांवरची चमक आणि तकाकी तशीच राहिल. आणि ह्यातील काहीही करता आले नाही, तर परिधान केलेले दागिने नीट काढल्यानंतर नीट त्याच्या बॉक्समध्ये कपाटात ठेवून दिलेले बरे.