सारा अली खान च्या गोलू-मोलू अवतारातील व्हिडिओ ने Cuteness च्या सा-या हद्द केल्या पार; Watch Video
Sara Ali Khan Fatty Video (Photo Credits: Instagram)

केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडसृष्टीत पदार्पण करणारी सारा अली खान (Sara Ali Khan) जितकी तिच्या सध्याच्या लूकमुळे चर्चेत आहे त्याच्यापेक्षा जास्त ती तिच्या काही वर्षांपूर्वीच्या लूक मुळे आहे. काही वर्षांपूर्वी 96 किलो वजनाची असलेली सारा अली खान स्वत:वर खूप मेहनत घेऊन ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. या कारणामुळेही ती बरीच चर्चेत असते. अलीकडे तिने आपला एक जुना फोटो शेअर केला होता. ज्यात ती खूप स्थूल दिसत होती. त्यानंतर आज तिने त्याच अवतारातला एक व्हिडिओ शेअर केला आहे. गोलू-मोलू असलेली सारा अली खान या व्हिडिओमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती एका विमानात आपल्या मैत्रिणींसोबत बसली आहे. ज्यात ती मैत्रिणींचे झोपलेले छुपे व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. यात तिचे निखळ हास्य, तिची निरागसता पाहून तिचे चाहतेही अक्षरश: वेडे झाले आहेत.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- सारा अली खान चा हा 'अगडबम' फोटो पाहून अभिनेता कार्तिक आर्यन ने केले असे मजेशीर कमेंट, वाचा सविस्तर

या व्हिडिओखाली सारा ने 'Presenting Sara ka Sara Sara' असे कॅप्शन दिले आहे. अतिशय खोडकर, मिश्किल असणा-या सारा ची आणखी एक बाजू तुम्हाला यात पाहायला मिळेल.

येत्या 14 फेब्रुवारीला सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा 'लव आज कल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा साराचे वडिल सैफ अली खानच्या लव आज कल चित्रपटाचा सिक्वेल आहे. इम्तियाज अली या चित्रपटाचे दिग्दर्शक असून यात अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतील.