Rhea Chakraborty, Rakul Preet Singh, Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेली रिया चक्रवर्ती हिला मुंबईतील भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, रिया हिने 25 जणांचा ड्रग्ज प्रकरणी नावे सांगितल्याचे समोरल आले होते. त्यात सारा अली खान, रकुल प्रित सिंग आणि सिनोम खंबाट्टा यांची नावे होती. तर एनसीबीने फिल्म इंडस्ट्री मधील कोणीही रडारखाली असल्याचे नाकारले आहे. आता अधिकाऱ्यांनी त्यांच्या नव्या विधानात असे म्हटले आहे की, सारा अली खान आणि रकुल यांच्या नावाची त्यांनी पुष्टी केली आहे. मात्र अद्याप अभिनेत्रींना समन्स पाठवले नसल्याचे ही एनसीबी कडून सांगण्यात आले आहे.

सारा अली खान, रकुल प्रित सिंग आणि सिमोन खंबाट्टा यांना आता एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पण या सर्वांना समन्स अद्याप धाडण्यात आलेले नाही असे ANI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. तर आता बॉलिवूड इंडस्ट्रीला या ड्रग्ज प्रकरणामुळे धक्का बसेल हे नक्कीच.(Sushant Singh Rajput Death Case: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कमरजित सिंग, ड्वेन फर्नांडिस आणि संदीप गुप्ता यांना कोर्टाने सुनावली येत्या 16 सप्टेंबर पर्यंत NCB कोठडी)

सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी सीबीआयने तपास करण्यासाठी नागरिक आणि त्याच्या परिवाराने दबाब टाकला. नंतर या प्रकरणाला ड्रग्जचे वळण लागत एनसीबीने याची अधिक चौकशी सुरु केली आहे. यामध्ये सुशांत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर विविध आरोप लावण्यात आले. तर तपासात सारा अली खान हिचे नाव प्रथमच आले असे नाही. तर यापूर्वी सुद्धा सारा हिने सुशांत आणि रिया सोबत थायलंड ट्रिप सुद्धा केली होती. काही रिपोर्टमध्ये असे ही समोर आले होते की, सुशांत आणि सारा एकमेकांना डेट करत होते.