मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून 24X7 पहारा करणा-या मुंबई पोलिसांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 'उमंग 2020' (Umang 2020). या कार्यक्रमाला मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मुंबई पोलिसांच्या करमणुकीसाठी हा विशेष कार्यक्रम मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी बॉलिवूड करांनी हजेरी लावली आहे. ही मंडळी आज मुंबई पोलिसांसह कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
यातील बरीच कलाकार मंडळी मुंबई पोलीसांच्या मनोरंजनाासाठी नृत्याविष्कार सादर करणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडची सध्याची नवीन ब्रिगेड म्हणजेच सारा अली खान, कार्तिक आर्यन, उर्वशी रौतेला, अर्जुन कपूर सह अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
पाहा त्यांचे ग्लॅमरस फोटोज:
कार्तिक आर्यन
अर्जुन कपूर
वरुण धवन
हेदेखील वाचा- मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होणार पोलिसांचे अश्वदल
अनन्या पांडे
View this post on Instagram
या उमंग कार्यक्रमात सारा अली खान आणि नुसरत भरूचा आपला नृत्याविष्कार सादर करणार आहे. त्यामुळे सर्वांनाच या सोहळ्याची विशेष उत्सुकता लागली आहे.