IAF ने 2019 मध्ये केलेल्या बालाकोट एअरस्ट्राईक वर लवकरच येणार चित्रपट, संजय लीला भन्साळी यांनी केली घोषणा केली
Sanjay Leela Bhansali (Photo Credits: Facebook)

Movie on IAF Airstrike Balakot:काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने केलेल्या या भीषण हल्ल्यात जवळपास 40 सीआरपीएफ जवान मरण पावले आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला.

या हल्ल्याच्या बारा दिवसांनंतर भारतीय वायुसेनेने (आयएएफ) भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हवाई हल्ला केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर लवकरच असा अंदाज वर्तविला जात होता की चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी या घटनेवर चित्रपट बनवण्यास उत्सुक आहेत. आणि आता तसं खरंच घडणार आहे.

टी-सीरिजचे हेड भूषण कुमार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले की संजय लीला भन्साळी, प्रज्ञा कपूर आणि महावीर जैन यांच्या सहकार्याने ही गोष्ट आम्ही आणत आहोत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत केदारनाथ आणि रॉक ऑन चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर.

Year Ender 2019: बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केलेले बॉलिवूडचे Top 10 चित्रपट, येथे पाहा यादी

दरम्यान, हा चित्रपट नक्कीच हिट होईल यात काही शंका नाही कारण बॉलीवूड मधील देशभक्ती आणि राष्ट्रवादाची पार्श्वभूमी असलेले चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरतात. उदाहरणार्थ, आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला आणि विकी कौशल अभिनित उरी- द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला.