टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत लग्नानंतर ‘या’ 5 बॉलीवूड अभिनेत्रींच्या करिअरवर लागला ब्रेक
नताशा स्टॅन्कोव्हिक आणि संगीत बिजलानी (Photo Credit: Instagram)

प्रेमाला कोणतीही सीमा माहित नसते आणि सुंदर बॉलीवूड-क्रिकेटपटूंची प्रेमकहाणी (Cricket-Bollywood Love Stories) ते सिद्धही करते. क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं खूप जुनं आहे. 1968 मध्ये टीम इंडियाचे माजी कर्णधार मंसूर अली खान आणि शर्मिला टागोर यांच्यापासून 2017 मध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्यापर्यंत हे नातं पोहचलं आहे. भारतातील लोकांना बॉलिवूड  (Bollywood) सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सने (Cricket) वेडा आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड हे आपल्या देशातील दोन सर्वात आकर्षक व्यवसाय आहेत आणि ते चाहत्यांकडे आपल्याकडे खूप आकर्षण आहे. क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमाबद्दल आजवर आपण अनेकदा ऐकले आहे. परंतु, भारतीय संघाच्या या प्रसिद्ध खेळाडूंसोबत लग्नानंतर काही अभिनेत्रींनी आपल्या बॉलीवूड करिअरवर ब्रेक लावला आहे. (Most Educated Wives of Indian Cricketers: कोणी पदवीधर तर कोणी डॉक्टर, या 5 स्टार टीम इंडिया क्रिकेटपटूंच्या पत्नींची मार्कशीट त्यांच्यापेक्षाही सरस!)

संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीताचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. 1996 मध्ये अझहरने तिला आपले जीवनसंगिनी बनवले. तिने आपले नाव बदलून आयशा अझर केले. तथापि, त्यांचे नातं पुढे बहरू शकलं नाही आणि 14 वर्षांच्या लग्नानंतर दोघे 2010 मध्ये विभक्त झाले.

हेजल कीच (Hazel Keech)

टीम इंडियाचा माजी सिक्सर किंग युवराज सिंह आणि सलमान खानचा चित्रपट 'बॉडीगार्ड' फेम हेजल चंदीगड येथे 2016 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर हेजलने बॉलीवूडपासून स्वतःला दूर ठेवले आहे.

सागरिका घाटगे (Sagarika Ghatge)

2017 मध्ये भारताचा माजी स्टार वेगवान गोलंदाज झहीर खान आणि शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी सागरिका घाटगे यांचा विवाहसोहळा पार पडला. सागरिकाने बॉलीवूडमधून ब्रेक घेतला असून ती सध्या वेब-सिरीज आणि मराठी चित्रपटांतून चाहत्यांच्या भेटीला येते.

नताशा स्टॅन्कोव्हिक (Nataša Stanković)

आयपीएल आणि भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने आणि नताशा स्टॅन्कोव्हिक यांनी कोरोना लॉकडाऊन काळात गुपचूप लग्न केलं. नताशाने 2013 मध्ये प्रकाश झा दिग्दर्शित सत्याग्रह चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या वर्षी ती ‘फ्लेश’ या वेब-सिरीजमध्ये झळकली होती.

गीता बसरा (Geeta Basra)

हरभजन सिंहची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री गीता बसराचे नाव देखील या यादीत सामील होते. गीता आणि भज्जी 2015 मध्ये लग्नबेडीत अडकले. लग्नानंतर गीता संपूर्णपणे आपल्या संसारात व्यस्त झाली आणि त्याने बॉलीवूडकडे वळून पहिले नाही.