मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा येणार रिमेक, सलमान खान दिसणार 'या' प्रमुख भूमिकेत तर आयुष शर्मा बनणार गँगस्टर
Mulshi Pattern remake (Photo Credits: Representative Image)

हिंदी चित्रपटांचे मराठी रिमेक येणे या गोष्टीला फाटा देत आता 'सैराट' नंतर आता मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक बनायला लागले आहेत. सैराटप्रमाणेच बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातलेला मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) चा हिंदीत रिमेक येणार आहे आणि या सिनेमा बनवणार आहे बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan). इतकच नव्हे तो या सिनेमात मुख्य भूमिकेत नसला तरी यात महत्त्वाची सहाय्यक भूमिका करणा आहे. तर त्याचा भावोजी आयुष शर्मा (Aayush Sharma) यात गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर्षी ईदला 'राधे' या चित्रपटाशिवाय सलमान या रिमेकवरही काम करत आहे अशी बातमी मिळाली होती.

पिंकविला च्या रिपोर्टनुसार, सलमान खान मुळशी पॅटर्न च्या रिमेकमध्ये या मराठी चित्रपटातील अभिनेता उपेंद्र लिमये यांनी साकारलेली पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष शर्मा यात गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा ट्रेलर:

हेही वाचा- धक्कादायक : कुख्यात गुन्हेगारांवर चित्रित झाले 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाचे गाणे

रिपोर्टनुसार, मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 2018 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान खान आणि अरबाज खान यांच्यासाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. त्यावेळी त्या दोघांना हा चित्रपट खूप आवडला होता. त्यावरून त्यांना या चित्रपटाचा रिमेक बनवायचे ठरवले. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करणार आहे.

या चित्रपटासाठी सलमानला 15-20 दिवस शूट करावे लागेल. रिपोर्टनुसार, सलमानचे सर्वात खास आणि जवळचे मित्र अभिनेते महेश मांजरेकर देखील या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. तसेच सई मांजरेकर देखील आयुष शर्मा सोबत या चित्रपटात झळकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.