बॉलिवूडचा भाईजान सलमान खान महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 'अंतिम' साठी सज्ज, 15 नोव्हेंबरपासून होणार शूटिंगला सुरुवात
Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) सध्या बिग बॉस 14 (Bigg Boss 14) व्या सीजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे या कार्यक्रमातील निवेदनाचे असंख्य चाहते आहेत. मात्र लॉकडाऊन पासून चित्रपटांपासून दूर असलेला सलमान खानची झलक आपल्याला कधी पाहायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच त्याच्या आगामी 'राधे' (Radhe) चित्रपटाचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'अंतिम' चित्रपटात दिसणार आहे. येत्या 15 नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

हा चित्रपट मराठी ब्लॉकब्लस्टर हिट ठरलेल्या मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक असेल. या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटात ही भूमिका उपेंद्र लिमये याने केली होती. त्याचबरोबर सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा हा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा येणार रिमेक, सलमान खान दिसणार 'या' प्रमुख भूमिकेत तर आयुष शर्मा बनणार गँगस्टर

 

View this post on Instagram

 

Bigg Boss is here ... #BiggBoss14

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लवकरच सलमानच्या आगामी चित्रपट राधे चे शूटिंग संपणार असून त्यानंतर तो अंतिम च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई आणि कर्जत अशा दोन ठिकाणी होणार आहे. हा चित्रपटातील मुख्य फरक असेल. गावात शूटिंग न करता मुंबईतच गावचा सेट उभारून याचे शूटिंग केले जाणार आहे अशी माहिती रिपोर्टनुसार मिळत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2021 पर्यंत चालेल असेही सांगण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 2018 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान खान आणि अरबाज खान यांच्यासाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. त्यावेळी त्या दोघांना हा चित्रपट खूप आवडला होता. त्यावरून त्यांना या चित्रपटाचा रिमेक बनवायचे ठरवले. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करणार आहे.