Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपल्या अभिनयामुळे, नृत्यामुळे, सामाजिक सेवेमुळे खूपच लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांमुळे देखील तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या खाजगी जीवनाबाबत अशा ब-याच गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. सलमान खान (Salman Khan) लवकरच आपले युट्यूब चॅनल लाँच करणार आहे. जेथे तो आपल्या खाजगी आयुष्यातील अशा अनेक घटना, गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करेल. सलमान ने या युट्यूब चॅनल चे नाव 'Being Salman Khan' असे नाव दिले आहे. सलमान खान सोशल मिडियावर बराच सक्रिय असतो. आपल्या सोशल अकाउंटच्या माध्यमातून तो आपले काम, वर्कआऊट आणि गंमतीदार किस्से आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सलमान आपले अनेक खाजगी गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करेल. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखीन त्याला जवळून ओळखायला मिळेल. Lockdown काळात सलमान खान ने मालेगाव मधील महिला मजुरांची मदतीची हाक ऐकली; 50 कामगारांसाठी पाठवून दिला किराणा

सलमान खान आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सला कोविड-19 विषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच त्याने कोरोना व्हायरसच्या ट्विस्टसह त्याच्या 1989 मधला ब्लॉकब्लस्टर चित्रपट 'मैंने प्यार किया' मधील एक रोमँटिक दृश्य रिक्रिएट केले होते. ज्याला लोकांनी खूप पसंत केले होते. सलमान खान याने रिक्रिएट केला 'मैंने प्यार किया' सिनेमातील सीन; पहा त्यातील कोरोना ट्विस्ट (Watch Video)

काही दिवसांपूर्वी मालेगाव (Malegaon) मधील महिला मजुरांनी लॉक डाऊन (Lock Down) काळात आपल्याला रेशन मिळत नसल्याचे सांगितले होते, त्यांच्या या तक्रारीला तात्काळ प्रतिसाद देत सलमान खान याने आपल्या टीमच्या हस्ते मालेगाव मध्ये 50 महिलांना किराणा पोहचवला आहे. या महिला रोजंदारीचे काम करतात मात्र लॉक डाऊन काळात त्यांचे काम बंद असल्याने आणि आता लॉक डाऊन लागू होऊनही बराच काळ झाल्याने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होत नव्हती. अशावेळी त्यांनी भाईजान सलमान ला मदतीची हाक दिली होती असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हंटले जात आहे.