Salman Khan Telugu Film Debut: सलमान खान करणार तेलुगु चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण; सुपरस्टार Chiranjeevi च्या Godfather चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका
Salman Khan, Chiranjeevi (Photo Credit : Twitter)

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चिरंजीवीच्या 'गॉडफादर' (Godfather) या चित्रपटातून तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त चिरंजीवी, नयनतारा आणि राम चरण देखील दिसणार आहेत. तेलगू चित्रपटांचा सुपरस्टार चिरंजीवीने त्याच्या ट्विटर हँडलवरून याची पुष्टी केली आहे. सलमान खानने या आगामी तेलुगू चित्रपट 'गॉडफादर'चे शूटिंग सुरू केले आहे. प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित व्हावेत यासाठी या चित्रपटातील सलमान खानची व्यक्तिरेखा गुप्त ठेवण्यात आली आहे.

परंतु ‘गॉडफादर’मध्ये सलमान खान एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अभिनेता चिरंजीवी यांनी लिहिले आहे की, ‘गॉडफादर चित्रपटामध्ये सलमान खान तुझे स्वागत आहे! तुझ्या एंट्रीने सगळ्यांना उत्तेजित केले आहे आणि उत्साह एका वरच्या पातळीवर पोहोचला आहे. तुझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे हा खूप आनंददायी अनुभव आहे. तुझी उपस्थिती निःसंशयपणे प्रेक्षकांना ती जादुई किक देईल.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा यांनी केले असून कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि सुपर गुड फिल्म्स यांनी निर्मिती केली आहे.

गॉडफादर हा चित्रपट पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित 2019 मल्याळम ब्लॉकबस्टर लुसिफरचा तेलुगु रिमेक आहे. या चित्रपटात मोहनलाल, विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. (हेही वाचा: आता छोट्या पडद्यावरही Ranveer Singh आणि Allu Arjun आमने-सामने; एकाच दिवशी, एकाच वेळी 'पुष्पा आणि '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर)

दरम्यान, सलमान खानच्या हिंदी चित्रपटांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट टायगर 3 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अंतिम द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. या चित्रपटात त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.