Watch Video: सलमान खान ने शेअर केला Dabangg 3 मधल्या ऍक्शन सीन चा धमाकेदार व्हिडिओ
सलमान खान (Photo Credits: Instagram)

Dabangg 3 Action Scene: सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'दबंग 3' लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला होता. विशेष म्हणजे दबंग 3 मध्ये सलमान एक नाही तर चक्क दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचसोबत 'दबंग' आणि 'दबंग 2' च्या तुलनेत यावेळी सलमान जास्त ऍक्शन सीन्स देखील करताना दिसेल.

सलमानने नुकताच या सिनेमातील एका अ‍ॅक्शन सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सिनेमातील एक दमदार डायलॉग बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये चुलबुल पांडे म्हणजेच सलमान म्हणतो, ‘जिसके आगे हो अली और पीछे हो बजरंगबली. उसका क्या बिगाड़ सकता है बली.’ तसेच सलमानने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 'बाली सिंह जैसे विलेन से भिड़ने का अलग ही मजा है..टक्कर इस बार जबरदस्त होगी'.

 

View this post on Instagram

 

At the Dabangg3 event for launch of the song #MunnaBadnaamHua @prabhudevaofficial #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

Bigg Boss 13: सलमान खान आजारपणामुळे सोडणार शो? फराह खान असू शकते नवी होस्ट

दरम्यान, चित्रपट आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दबंग 3 मध्ये आपल्याला किच्चा सुदीप व्हिलन बलीची भूमिका साकारताना दिसणार आहे तर सलमान चुलबुल पांडेची. ‘दबंग 3’चं दिग्दर्शन प्रभूदेवा याने केलं आहे. तसेच चित्रपटात सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, माही गिल, महेश मांजरेकर आणि त्यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान सोबत सोनाक्षीच नाही तर सई मांजरेकर सुद्धा रोमान्स करताना दिसेल.