Coronavirus चा धोका टाळण्यासाठी 'सलमान खान'ने सुचवला हटके उपाय; पहा पोस्ट
Salman Khan (Image Credit: Instagram)

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान (Salman Khan) याची स्टाईल काहीशी हटके आहे. जगातील इतर देशांसह भारतातही पसरत जाणाऱ्या कोरोना व्हायरसची दहशत नागरिकांमध्ये वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने देखील आपल्या चाहत्यांना खास सल्ला दिला आहे.

सलमान खानने जीममध्ये बसलेला एक शर्टलेस फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे. त्यात त्याने लिहिले की, "नमस्कार! आपल्या संस्कृतीत नमस्ते किंवा सलाम! जेव्हा कोरोना व्हायरसचा नष्ट होईल तेव्हाच हात मिळवा आणि मिठी मारा." सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांच्या जबरदस्त कमेंट्स येत आहेत. ('राधे'ला टक्कर द्यायला सज्ज झालाय हा अभिनेता; याआधीही Salman Khan सोबत केलंय काम)

सलमान खान याची पोस्ट:

कोरोना व्हायरसचा परिणाम सलमान खान याच्या 'राधे' सिनेमावरही झाला आहे. सिनेमाचे शूटिंग थायलँड येथे होणार होते. मात्र चीनसह इतर देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे थायलँडमधील शूटिंग रद्द करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी राधे सिनेमाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

'राधे' सिनेमात सलमान खान सह दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेममाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत असून ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.