'राधे'ला टक्कर द्यायला सज्ज झालाय हा अभिनेता; याआधीही Salman Khan सोबत केलंय काम
Radhe Movie | (Twitter)

नुकतीच काही दिवसांपूर्वी सलमान खानने आपल्या आगामी 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटाची घोषणा केली. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा करणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. परंतु अद्यापही बाकीची टीम आणि इतर कलाकार कोण ही माहिती गुलदस्त्यात होती.पण आता या टक्कर कोण देणार या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या नावाचा पर्दाफाश झाला आहे.

सलमान सोबत याआधीही 2 सिनेमामध्ये काम केलेला अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असल्याचं उघड झालं आहे. याआधी त्याने 'किक' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची तर 'सुलतान' मध्ये ट्रेनरची भूमिका केली होती. याबाबत बोलताना सिनेमाशी निगडित एक सूत्र म्हणाले,''रणदीप या सिनेमात खलनायक साकारत आहे. अशा प्रकारची भूमिका त्याने आधी केलेली नाहीये. हा त्याचा पहिला अनुभव असणार आहे. त्याला ही भूमिका खुप आवडली. म्हणूनच त्याने होकार भरला आहे. तसेच सलमान आणि रणदीपने यापूर्वीही काम केले असल्या कारणाने दोघांनाही एकमेकांच्या कामाची चांगलीच जाण आहे.''

 

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

Here’s looking at ya #tbt #throwbackthursday #actor #actorslife #movies #cinema #makeup @renukapillai_official #hair @perriipatel

रोजी Randeep Hooda (@randeephooda) ने सामायिक केलेली पोस्ट

या सिनेमातही सलमान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना सलमान म्हणाला होता,''राधे हे माझ्या पात्राचं नाव तेरे नाम पासून प्रचलित झालं होतं. आम्ही वॉन्टेड मध्ये सुद्धा तेच नाव वापरलं होतं . पण हा राधे पूर्णपणे वेगळा असणार आहे. हा सगळ्यांचा बाप निघेल. हा चित्रपट पूर्णतः वेगळा असून वॉन्टेडशी याचा काही एक संबंध नाही.'' (हेही वाचा. 'Dabangg 3' चं टायटल ट्रॅक रिलीज करताना सलमान खानने वापरला हा अनोखा फंडा; पाहा व्हिडिओ)

'राधे' हा सिनेमा 2020 च्या ईदला रिलीज होत आहे. चित्रीकरणाला थोडेच दिवसात सुरुवात होते आहे.