पनवेल मधील फार्महाऊसवरुन परतला सलमान खान; 'बिग बॉस 14' च्या शूटिंगला सुरुवात (See Pics)
Salman Khan | (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) कोविड-19 लॉकडाऊनमध्ये पनवेल (Panvel) मधील आपल्या फॉर्महाऊसवर होता. आता मात्र तो मुंबईत परतला असून 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) च्या शूटिंगला देखील त्याने सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील वांद्रे (Bandra) येथील महबूब स्टुडिओ (Mehboob Studio) मधून शूटिंग करुन बाहेर पडताना दिसला. त्यावेळेचे त्याचे काही फोटोज समोर आले आहेत.

शूटिंग संपवून महबूब स्टुडिओ मधून बाहेर पडून कार मध्ये बसून घरी जातानाचे काही फोटोज पाहायला मिळत आहेत. अलिकडेच सलमान खान याने बिग बॉस सीजन 14 चा प्रोमो शेअर केला होता. यात सलमान खानच्या पनवेल फॉर्महाऊसमधील काही क्षणही पाहायला मिळत आहेत. (सलमान खान याच्या 'बिग बॉस 14' चा पहिला प्रोमो रिलीज; 2020 ला उत्तर देण्यासाठी सज्ज)

पहा फोटोज:

कोविड-19 लॉकडाऊनमुळे 'राधे: द मोस्ट वॉन्टेड' सिनेमा वेळेत प्रदर्शित झाला नसला तरी स्वतः गायलेली नवी गाणी सलमान खान याने प्रेक्षकांच्या भेटीला आणली. तसंच फॉर्महाऊसवरील अपडेट्स फोटोज, व्हिडिओजच्या माध्यमातून शेअर करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सलमान खान सह फॉर्महाऊसवर यूलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिज, वालुशा डिसूजा आणि कुटुंबातील काही सदस्य होते. दरम्यान सीजन 14 हिट करण्यासाठी बिग बॉसमध्ये मोठी नावे सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बिग बॉस 14 बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.