Bigg Boss 14 First Promo: सलमान खान याच्या 'बिग बॉस 14' चा पहिला प्रोमो रिलीज; 2020 ला उत्तर देण्यासाठी सज्ज
Salman Khan (Photo Credits: Yogen Shah)

सलमान खान (Salman Khan) याच्या बिग बॉस (Bigg Boss) या रियालिटी शो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. या लोकप्रिय शो ची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे 2020 वर्षाची सुरुवात काहीशी कठीण आणि वेगळी झाली आहे. त्यामुळे यंदा बिग बॉसचा 14 वा सीजन नेमका कसा रंगणार याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. तसंच कोविड-19 संकटामुळे हा शो कसा होणार? शो दरम्यान कोणती खबरदारी घेतली जाईल? असे अनेक प्रश्नही त्यांच्या मनात होते. परंतु, आता बिग बॉसचा नवा 14 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉस सीजन 14 चा पहिला प्रोमो समोर आला आहे. यात नेहमीप्रमाणे सलमानचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.

बिग बॉस 14 च्या प्रोमो मध्ये सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसवरील काही दृश्यं पाहायला मिळत आहेत. सलमान खान ट्रॅक्टर चालून शेती करत असल्याचे प्रोमोत दिसते. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नॉर्मल लाईफला सुरुवात करत बिग बॉसचा प्रोमो प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. लॉकडाऊनमुळे नॉर्मल लाईफला स्पीड ब्रेकर लागला. त्यामुळे मी ट्रॅक्टर चालवला, भाताची शेती केली. पण आता सीन बदलेल, असं सलमान प्रोमोत सांगत आहे. (Bigg Boss 14: सप्टेंबरपासून सुरु होणार सलमान खानच्या ‘बिग बॉस’चा 14 वा सिझन; निया शर्मा, व्हिव्हियन डीसेना, अध्यायन सुमन होऊ शकतात यंदाच्या पर्वाचा हिस्सा)

पहा बिग बॉस सीजन 14 चा प्रोमो:

दरम्यान हा शो नेमका कधी सुरु होणार याची माहिती समोर आलेली नाही. मात्र मागील सीजनप्रमाणे हा सीजन देखील लोकप्रिय करण्यासाठी शो मध्ये मोठी नावे सहभागी करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. त्यामुळे नवा सीजन अधिक धमाकेदार असेल, असे बोलले जात आहे.