Salman Khan (Photo Credit - ANI)

Bigg Boss 16: रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 16 वा सीझन सुरू होणार आहे. या शोशी संबंधित गोष्टींबाबतही अटकळांचा फेरा सुरू झाला आहे. स्पर्धकांनंतर आता शोचा होस्ट सलमान खानशी (Salman Khan) संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे. ताज्या रिपोर्ट्समध्ये भाईजानच्या फीचा खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान 'बिग बॉस 16' साठी वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF: Chapter 2' च्या बजेटपेक्षा दहापट फी घेत आहे.

'बिग बॉस 15' दरम्यान समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात होता की, सलमान खानने बिग बॉसच्या 15 व्या सीझनसाठी 350 कोटी रुपये फी घेतली आहे. त्याचवेळी, समोर येत असलेल्या ताज्या वृत्तानुसार, सलमान खानने 16 व्या सीझनसाठी तिप्पट फी वाढवली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16' साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये घेत आहे. (हेही वाचा - Raju Srivastav Health Update: अफवा थांबवा, राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही, व्हायरल वृत्त चुकीचे; शेखर सुमन यांचे आवाहन)

KGF 2 च्या बजेटपेक्षा 10 पट जास्त फी घेणार -

दरम्यान, 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट KGF: Chapter 2 हा आहे. यश अभिनीत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 1000 कोटी रुपये (एकूण) आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 1207 कोटी रुपयांची कमाई केली. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास 100 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या अर्थाने, सलमान खान वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बजेटपेक्षा 10 पट जास्त शुल्क घेत आहे.

नवीन हंगामाचा प्रीमियर ऑक्टोबर 2022 मध्ये अपेक्षित आहे. शोसाठी निर्माते सक्रियपणे स्पर्धकांची निवड करत आहेत. बिग बॉस 16 च्या घोषित उमेदवारांच्या यादीत लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी, टिकटॉक फेम फैसल शेख, टीव्ही अभिनेत्री शिवीन नारंग आणि विवियन डिसेना यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर पूनम पांडे, जन्नत जुबेर, कनिका मान, सायशा शिंदे, प्राची देसाई, दीपिका सिंह यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.