कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले नाही. कृपा करुन अफवा थांबवा. त्यांच्या निधनाबद्दल व्हायरल झालेली सर्व वृत्त निराधार आणि चुकीची आहेत, असे शेखर सुमन यांनी म्हटले आहे. यासोबतच शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे अवाहनही त्यांचे चाहते आणि हितचिंतकांना केले आहे. ट्विटरवरुन हे अवाहन करताना शेखर सुमन यांनी ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ हा मंत्रही शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)