Salman Khan चा Radhe:Your Most Wanted Bhai आज रिलीज होणार; जाणून घ्या कसा आणि कोठे पाहू शकता चित्रपट
Radhe: Your Most Wanted Bhai (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) चा चित्रपट राधे: योर मोस्ट वांटेड भाई ( Radhe: Your Most Wanted Bhai) आज रिलीज होणार आहे. कोरोना विषाणूमुळे देशातील जवळपास सर्व चित्रपटगृहे बंद आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षक आपल्या सुपरस्टारचा चित्रपट पाहण्यास अस्वस्थ झाले आहेत. सलमानचा हा चित्रपट भारताबाहेरील बर्‍याच देशांच्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट भारतातील प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. ज्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. प्रेक्षक Zee पे व्यू ZeePlex वर चित्रपट पाहण्यास सक्षम असतील. हा चित्रपट झी 5, झी 5 ओटीटी आणि सर्व मोठे डीटीएच ऑपरेटरवर पाहू शकता. यासाठी प्रेक्षकाला 249 रुपये द्यावे लागतील.

भारतात हा चित्रपट त्रिपुराच्या तीन थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार हा चित्रपट SSr Rupasi, बालका सिनेमा आणि SSR धर्मनगरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  (वाचा - Radhe: सलमान खान म्हणतो 'No Piracy In Entertainment')

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

त्याचवेळी हा चित्रपट 40 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये न्यूझीलंड, कॅनडा, दुबई आणि युएई या मोठ्या देशाचा समावेश आहे. सलमान खानने आपल्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, जेव्हा भारतात कोविडची स्थिती सुधारेल त्यावेळी तो राधे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करेल. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सलमान खानेने व्यक्त केला आहे.