सलमान खान चा Dabangg 3 वादाच्या भोवऱ्यात; गाण्यातील दृश्यांवर घेण्यात आला आक्षेप
Salman Khan | (Twitter)

Dabangg 3 Controversy: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दबंग 3' प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामागचं कारण म्हणजे 'हुड हुड दबंग' हे गाणं. या गाण्यातील दृश्यांवर हिंदू जनजागृती समितीतर्फे आक्षेप घेण्यात आला आहे.

चित्रपटातील 'हुड हुड दबंग' या गाण्यात श्रीकृष्ण, श्रीराम, भगवान शिवची भूमिका केलेले कलाकार अभिनेते सलमान खानचा आशीर्वाद घेताना दाखवले आहेत. म्हणूनच या गाण्याचा कडाडून विरोध करण्यात येत आहे.

मंगळवारी हिंदू जनजागृती समितीकडून निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. त्याचसोबत #BoycottDabangg3 हा हॅशटॅग वापरून अनेकांनी याविरुद्ध एक मोहीम ट्विटरवर राबवली.

या विरोधाबद्दल सलमान खानने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, 'असे वाद येत- जात असतात.' यानंतर वरीना हुसैनकडे पाहत सलमान पुढे म्हणाला की, 'वरिनाच्या सिनेमाच्या नावावरूनही वाद झाला होता. पण आता सर्व काही शांत आहे.'

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलं असून सलमान खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि सई मांजरेकर हे देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

'Dabangg 3' चं टायटल ट्रॅक रिलीज करताना सलमान खानने वापरला हा अनोखा फंडा; पाहा व्हिडिओ

दबंग आणि दबंग 2 प्रमाणे याही सिनेमात सलमान चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. आणि येत्या 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे.