Dabangg 3 Release Date: 20 डिसेंबरला सलमान खान घेऊन येणार 'दबंग 3'
Dabangg 3 (Photo Credits: Facebook)

सलमान खान (Salman Khan) त्याच्या चाहत्यांसाठी यंदा ईदच्या मुहूर्तावर 'भारत'(Bharat) आणि ख्रिस्मसच्या मुहूर्तावर 'दबंग 3' (Dabangg 3 )हा सिनेमा घेऊन येणार आहे. आज सलमान खानने ट्विटर हॅन्डलवरुन 'दबंग 3' ची रीलीज डेट सांगितली आहे. दबंग 3 हा सिनेमा 20 डिसेंबरला रीलिज होणार आहे. महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी, 'दबंग 3' मधून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

सलमान खानने रीलिज डेट सांगताना 'चुलबूल इज बॅक' असं कॅप्शन लिहून फोटो शेअर केला आहे. सलमान खान 'दबंग़' सिनेमामध्ये पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारत आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये 'सोनाक्षी सिन्हा' झळकणार आहे. 'दबंग' सीरीजचा हा तिसरा भाग आहे. 'सलमान खान'ने दबंग 3 च्या शूटिंगला केली सुरूवात; पहा 'चुलबूल पांडे'ची पहिली झलक

सलमान खान Tweet

'दबंग' आणि 'दबंग 2' हे सिनेमे अरबाझ खानने दिग्दर्शित केले होते. तर 'दबंग 3' च्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा सांभाळणार आहे. या सिनेमाचं पहिलं शेड्युल मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये पार पडलं.