सलमान खान 54व्या वाढदिवशी बनणार मामा! बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी 'असा' केलाय स्पेशल प्लॅन
Salman Khan, Ayush Sharma and Arpita Khan Sharma (Photo Credits: Instagram)

सलमान खान (Salman Khan) येत्या 27 डिसेंबर ला वयाच्या 54 व्या वर्षात पदार्पण करणार आहे, या निमित्ताने दबंग खानचे फॅन्स आतापासूनच उत्साहात आहेत. दरवर्षीच गॅलॅक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment) बाहेर जमा होऊन, सोशल मीडियावरून अनेक फॅन्स आपल्या लाडक्या भाईजानला शुभेच्छा देत, त्याचा हा दिवस खास करण्याचा प्रयत्न करत असतात. तसाच यंदाही सलमानचा वाढदिवस विशेष असणार आहेच, मात्र एका वेगळ्याच कारणाने.. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान (Arpita Khan) आणि तिचा पती आयुष शर्मा (Ayush Sharma)  हा सलमानला वाढदिवसानिमित्त एक हटके गिफ्ट द्यायचा प्लॅन करत आहेत. हे गिफ्ट म्हणजे एखादी महागडी वस्तू नसून अर्पिता- आयुषचे दुसरे बाळ असणार आहे. सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता सी- सेक्शन डिलव्हरीने (C- Section Delivery) आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असून हे सलमानसाठी यंदाचे एक गोंडस गिफ्ट असणार आहे, असे समजतेय.

Mumbai Mirror च्या वृत्तानुसार, अर्पिता आणि आयुष यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी डॉक्टरांनी पुढील महिन्यातील तारीख दिली होती, या बाळाचे आगमन सलमान च्या वाढदिवसाचे निमित्त साधून व्हावे अशी या दोघांची इच्छा आहे. SpotboyE ला दिलेल्या मुलाखतीत अर्पिताने , दुसऱ्या बाळाचा विचार आम्ही केला नव्हता मात्र आता आम्ही आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया दिली होती.Aamir Khan, Shahrukh Khan आणि Salman Khan पहिल्यांदाच एकत्र दिसणार रुपेरी पडद्यावर? वाचा सविस्तर

 

View this post on Instagram

 

Love you @aaysharma & Ahil ♥️ 📸 courtesy @kvinayak11

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

अर्पिता आणि आयुष यांचा 2014 मध्ये विवाह झाला होता. तर, 30 मार्च 2016 रोजी त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता.

तर यंदा, डिसेंबर मध्ये शर्मा आणि खान कुटुंबीय आपल्या नव्या लहानग्या मेंबरचे स्वागत करण्यास तयार आहेत.