Aamir Khan, Shahrukh Khan आणि Salman Khan पहिल्यांदाच एकत्र दिसणार रुपेरी पडद्यावर? वाचा सविस्तर
Aamir Khan, Shahrukh Khan, Salman Khan | (facebook , PTI and getty)

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान, 3 सुपरस्टार्स. 90 च्या दशकानंतर बॉलीवूडचा डोलारा ज्यांनी आपल्या खांदयावर झेलला अशा मोजक्या कलाकारांपैकी 3 महत्वाची नावं. आज जवळपास 30 वर्ष तिघंही दर्जेदार चित्रपट देत आहेत. पण आजपर्यंत तिघांनी एकदाही एकमेकांसोबत काम केलेलं नाही.

आमिर आणि सलमानने 'अंदाज अपना अपना' मध्ये सोबत काम केलं होतं. तर शाहरुख आणि सलमानने 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है' सारख्या सिनेमांत एकत्र काम केलं होतं. पण आमिर आणि शाहरुखने आजवर कुठलाही सिनेमा सोबत केलेला नाही. पण आता त्यांच्या चाहत्यांना ती संधी लाभली आहे. तिघंही आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' मध्ये एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे.

'लाल सिंग चड्ढा' हा टॉम हँक्सच्या ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. त्या सिनेमाच्या सुरवातीला टॉम हँक्स एका बेन्च वर बसलेला आहे असा प्रसंग आहे, तर या सिनेमात त्यात थोडा बदल करून आमिर खान ट्रेनने प्रवास करतो आहे असे दाखवण्यात आले आहे. प्रवासातच आमिरचं पात्र त्याची कथा सांगायला सुरवात करेल. (हेही वाचा. Karan Johar ने काढलं भात्यातील 'ब्रह्मास्त्र'; Shahrukh Khan करणार Ranbeer-Alia सोबत काम)

कोईमोईच्या वृत्तानुसार आमिर खानने एक खास भूमिका शाहरुखसाठी योजली आहे. यात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत नसेल तर एक महत्वाचं पात्र असणार आहे. कथा पुढे सरकण्याचा दृष्टीने ते खूप गरजेचं असणार आहे. इतकच नव्हे तर अमेरन टेसरी भूमिका सलमानसाठी राखून ठेवली आहे. शाहरुख खानने आपल्या भूमिकेला मंजुरी दिली असली तरीही सलमानने अद्याप होकार कळवला नाहीये.

हा सिनेमा 2020 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. यात आमिर खान सोबतच करीना कपूरही असणार आहे. याचं दिग्दर्शन अद्वैत चंदन याने केलं आहे. तर लेखन अतुल कुलकर्णी यांचं आहे.