Runway 34 Trailer: 'रनवे 34' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, सत्य घटनेवर आधारित चित्रपट
Runway 34 Trailer (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांच्या आगामी 'रनवे 34' या चित्रपटाचा ट्रेलर (Runway 34 Trailer) आज म्हणजेच सोमवारी प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाशी संबंधित सर्व स्टार्सनी घोषणा केली होती की, 'रनवे 34' चित्रपटाचा ट्रेलर 21 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या घोषणेपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे.Phoo चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर त्याचे व्हिज्युअल खूपच छान दिसत आहेत.

या चित्रपटात त्या पैलूंना स्पर्श करण्यात आला आहे, ज्यांची अनेकांना माहिती नाही. पायलटच्या दृष्टिकोनातूनही कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत. अजय देवगण कोर्टात त्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसुन येत आहे.

अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय देवगण दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध यूट्यूबर कॅरिमिनती देखील आहेत. हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग यांच्याशिवाय अंगिरा धर, बोमन इराणी आणि आकांक्षा सिंग देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 29 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (हे देखील वाचा: RRR Movie Promotion: RRR चित्रपटाची स्टारकास्ट अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, देशभरात करत आहे प्रमोशन)

'रनवे 34' ची कथा सत्य घटनेवर आधारित

रनवे 34 चित्रपटाची कथा जेट एअरवेजच्या दोहा कोची फ्लाइटच्या एका सत्य घटनेवरून प्रेरित आहे. ही घटना 2015 ची आहे, जेव्हा खराब हवामान आणि अगदी कमी दृश्यमानता असूनही, विमानाच्या पायलटने अनेक अडचणींना न जुमानता विमान विमानतळावर उतरवले. असे म्हटले जाते की ते एक प्रकारचे आंधळे लँडिंग होते. या अंध लँडिंगमध्ये सुमारे 150 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. या पराक्रमासाठी, फ्लाइट कॅप्टनला पदावनतीचा सामना करावा लागला आणि त्याची रँक कॅप्टनमधून को-पायलट करण्यात आली.