बहुप्रतिक्षित 'RRR' या चित्रपटाचा टीझर रिलीज, अॅक्शन आणि इमोशनलचा जबरदस्त तडका
RRR: Alia Bhatt, Jr NTR, Ram Charan and Ajay Devgn (Photo Credit: Twitter)

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आगामी 'RRR' या चित्रपटाची लोकं आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित 'RRR' या चित्रपटाची एक छोटीशी झलक निर्मात्यांनी  शेअर केली आहे. आलिया भट्ट, (Aliya Bhatt) ज्युनियर एनटीआर, (Jn. NT Rama Rav) राम चरण (Ram Charan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांसारख्या मोठ्या दिग्गज कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा 45 सेकंदांचा टीझर आहे. या टीझर मध्ये अॅक्शन आणि इमोशनलचा जबरदस्त तडका आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता 'RRR' च्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर करण्यात आला आहे, ज्यात हा चित्रपट संपूर्ण जगभरात 17 जानेवारीला रीलीज होईल असे सांगण्यात आले आहे. (हे ही वाचा इथून पुढे कधीही करणारा नाही OTT वर काम', अभिनेता Nawazuddin Siddiqui चा मोठा निर्णय; समोर आले धक्कादायक कारण.)

एसएस राजामौली हे केवळ त्यांच्या चित्रपटांच्या भव्य सेट आणि भव्यतेसाठी ओळखले जातात. 'RRR' चा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालेल असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही. बाहुबलीसारखा (Bahubali) ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर राजामौली यांच्याकडून याच मेगा बजेट चित्रपटाची अपेक्षा सर्वांना होती. अशा परिस्थितीत राजामौली यांनी  प्रेक्षकांच्या भावनांची विशेष काळजी घेतली असून बाहुबलीसारखा 'RRR'ही भव्यतेने तयार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

 

चित्रपटाचा टीझर सर्वांनाच आवडणार आहे. 'RRR' टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत. आलिया भट्ट आणि अजय देवगण पहिल्यांदाच एका साऊथ चित्रपटात दिसणार आहेत. यापूर्वी हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनाच्या कहरामुळे ही योजना पुढे ढकलावी लागली.