CSMT Bridge Collapse: अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, हेमा मालिनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना
Riteish Deshmukh, Amitabh Bachchan & Hema Malini (Photo Credits: Archived, Edited, Representative Images)

मुंबई (Mumbai) च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus) जवळील पादचारी पूल कोसळल्याने झालेल्या झालेल्या दुर्घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाला तर 36 लोक गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला. आता काही सेलिब्रेटींनीही ट्विट करत मृतांच्या, जखमींच्या नातेवाईकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुर्घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh):

अत्यंत दुःखद घटना. लोकांचे प्राण गेल्याने अत्यंत दुःख वाटले. मृतांच्या नातेवाईकांसाठी संवेदना व्यक्त करत जखमी लोकांसाठी प्रार्थना रितेशने केली. मुंबई पूल दुर्घटना टाळता आली असती. या बेजबाबदारपणासाठी कोणालाही माफ करता येणार नाही.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan):

दुःखी आहे आणि शांततेने प्रार्थना करत आहे. मुंबई शहर.

अनुपम खेर (Anupam Kher):

मुंबई ब्रिज दुर्घटनेबद्दल जाणून अत्यंत वाईट वाटले. मृतांच्या नातेवाईकांसोबत माझी प्रार्थना असेल. देवे, त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

हेमा मालिनी (Hema Malini):

दुःखद घटना- यंदा मुंबईच्या हृदयात. मुंबईत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 लोकांनी प्राण गमावले तर 36 जण जखमी झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांसाठी प्रार्थना.

विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi):

मुंबईतील पूल कोसळल्याची घटना ऐकून धक्का बसला. दुर्घटनेचे फोटोज आणि व्हिडिओज अत्यंत वेदनादायक आहेत. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना.

आज (शुक्रवार, 15 मार्च) सकाळी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूसही केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही सांगितले.