RIP Wajid Khan: प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा, अमिताभ बच्चन, प्रियंका चोपड़ा पासून फराह खानसह अनेकांनी व्यक्त केले दु:ख
Amitabh Bachchan and Farah Khan (Image Credit: Facebook)

बॉलिवूडचे प्रख्यात संगीतकार तसेच गायक वाजिद खान (Wajid Khan) यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकारांची जोडी साजिद-वाजिद यांनी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. दबंग सलमान खानशी त्यांचे खूप जवळचे नाते असून त्याच्या बहुतांश चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. वाजिद खान यांचे अचानक जाण्याने मनाला चटका लावणारे असल्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar), प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.

वाजिदच्या निधनाने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अमिताभ बच्चन

अक्षय कुमार

प्रियंका चोपड़ा

हेदेखील वाचा- बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन, वयाच्या 43 वर्षी घेतला अखेरचा श्वास

करण जौहर

वरुण धवन

परिणिती चोपड़ा

वाजिद खान यांना किडनीचा आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.