बॉलिवूडकरांसाठी 2020 हे वर्ष फारसे चांगले नाही असच एकूणच चित्र निर्माण झालय. महिन्याभरापूर्वी अभिनेता इरफान खान आणि ऋषि कपूर यांचे निधन झाले होते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक वाजिद खान (Wajid Khan) यांचे आज पहाटे निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. त्यांना किडनीचा आजार होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, असे संगितकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या. सलमान खान चे ईद निमित्त प्रदर्शित 'भाई भाई' गाणे सोशल मिडियावर घालतय धुमाकूळ, काही तासांतच 40 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज
Maharashtra: Music composer & singer Wajid Khan passes away at a hospital in Mumbai. pic.twitter.com/PnWkX5RrCq
— ANI (@ANI) May 31, 2020
संगीतकारांमध्ये साजिद-वाजिद प्रचंड लोकप्रिय होती. यातील वाजिद खान यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. या जोडीने आतापर्यंत एक था टायगर, वॉन्टेड, मैने प्यार क्यूं किया यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. सलमान खानच्या बहुतांशी चित्रपटातील गाण्यांना या जोडीने संगीत दिले आहे.
वाजिद खान हे उत्कृष्ट गायक देखील होते. त्यांनी आतापर्यंत अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यातील 'लव्ह मी लव्ह मी, सनी दे नखरे, हुड हुड दबंग' ही त्यातीलच काही लोकप्रिय गाणी.