Salman Khan (Photo Credits: Youtube)

रमजान ईद (Ramzan Eid) निमित्त काल (25 मे) सर्वत्र मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. ईद आणि बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) यांचा चित्रपट हे जणू एक समीकरण बनलं आहे. असे असताना यंदा लॉकडाऊन मुळे भाईजान सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सलमानच्या चाहत्यांसाठी सलमान त्याच्या आवाजातील 'भाई भाई' (Bhai Bhai Song) हे गाणे प्रदर्शित केले. हे गाणे स्वत: सलमान खानने लिहिले आहे. रमजान ईदचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या गाण्याला युट्यूबवर काही क्षणातच 40 लाखाहून अधिक व्हयूज मिळाले.

सलमानचे 'भाई भाई' गाणे सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असून 25 मे च्या संध्याकाळी हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे साजिद-वाजिद (Sajid-Wajid) या जोडीने संगीत बद्ध केले असून सलमान आणि डॅनिस साबरी यांनी मिळून हे गाणे लिहिले आहे.

ऐका 'भाई भाई 'गाणे:

हे गाणे सलमान खान ने ट्विटरवर शेअर करुन मी तुमच्यासाठी काहीतरी बनवले आहे, ऐकून सांगा कसे वाटले असे आपल्या चाहत्यांना सांगत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

लॉकडाऊन मुळे सलमानचा 'राधे' चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. हा चित्रपट तो ईदला प्रदर्शित करणार होता. यामुळे हताश झालेल्या आपल्या चाहत्यांसाठी यंदा सलमान खानने हे अनोखे गिफ्ट दिले.