Richa Chadha Pregnancy: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी येणार छोटा पाहुणा; जोडप्याने अनोख्या पद्धतीने शेअर केली आनंदाची बातमी
Richa Chadha, Ali Fazal (PC - Instagram)

Richa Chadha Pregnancy: गुरुवारी यामी गौतम (Yami Gautam) ने तिच्या गरोदरपणाची बातमी देऊन तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. आता बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) देखील पालक होणार आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपण आई-बाबा होणार असल्याचं म्हटलं आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी इंस्टाग्रामवर एका सुंदर पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला असून त्यात लिहिले आहे, 1 + 1 = 3. अली फजने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, 'एक लहान हृदयाचा ठोका हा आपल्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे.' अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट करत या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

अली फजने रिचा चड्ढासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गर्भवती मुलीची इमोजीही दिसत आहे. या गोड बातमीनंतर श्वेता बसू प्रसाद, श्रिया पिळगावकर, हिमांशी चौधरी, नताशा भारद्वाज, हर्षित शेखर गौर आदींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे जोडपे आई-वडील होणार आहेत. (हेही वाचा -Yami Gautam Pregnant: यामी गौतम होणार आई; लग्नाच्या 3 वर्षांनंतर अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज!)

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचा विवाह 4 ऑक्टोबर 2022 रोजी झाला. त्यांचे लग्न कोरोना लॉकडाऊन दरम्यान होणार होते. पण साथीच्या आजारामुळे तारखा पुढे ढकलण्यात आल्या. याआधी त्यांनी दिल्लीत प्री-वेडिंग सेरेमनी केली होती. त्यानंतर त्यांनी लखनऊमध्ये लग्न केले. यानंतर मुंबईत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते.