Sushant Singh Rajput Birth Anniversary: लाखो फॅन्सच्या मनाला चटका लावून गेलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज बर्थ अनिव्हर्सरी
Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मोठ्या पडद्यासह त्याच्या फॅन्सच्या मनावर देखील आपले नाव कोरले. बॉलिवूडमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके सिनेमे सुशांतने दिले असले तरी त्यापैकी कित्येक सिनेमे सुपरहिट ठरले आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने विशेष जागा कमावली. सुशांत सिंग राजपूतने आपल्या करिअरची बॅक स्टेज डान्सर म्हणून केली आणि नंतर तो एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला. नंतर त्या हिंदी डेली सोप एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मधील अभिनयाच्या सौजन्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. सुशांतची ही मालिका आणि मानव हे पात्र देशांतील घराघरात आवडीचं झालं. या मालिकेच्या प्रसिध्दीवर लगचे ब्रेक न लगावता सुशांतने त्याच्या मेहनतीचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आणि काय पो चे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. सुशांत पहिलाचं सिनेमा हिट ठरला आणि सर्वस्तरातून सुशांतच्या अभिनयाचं मोठ कौतुक झालं.

 

अवघ्या सात वर्षांच्या बॉलिवूड करियरमध्ये सुशांतने काय पो चे, एम एस धोनी, पी के, केदारनाथ, छिछोरे, एम एस धोनी सारखे सुपर हिट सिनेमे दिले. सुशांतचा प्रत्येक सिनेमा हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे. त्याने पडद्यावर निभावलेल्या प्रत्येक भुमिका तो खरोखरचं जगतोय की काय अशी प्रेक्षकांना सिनेमा बघताना अनुभुती यायची. सुशांत सिंह राजपूत हा स्वबळावर टिकीट टू बॉलिवूड मिळवणारा अभिनेता असुन अगदी कमी कालावधीने सुशांतने मोठी लोकप्रियता मिळवली होती. (हे ही वाचा:- Priyanka Chopra On Vogue: देसी गर्ल प्रियंका चोप्रा ठरली ब्रिटीश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री)

 

आज अभिनेता सुशांत आपल्यात असता तर त्याचा ३७ वा वाढदिवस तो अगदी धुमधडाक्यात साजरा करत असता. पण सुशांत आता आपल्यातून जावून जवळपास तीन वर्ष होतील. अगदीचं कमी वयांत आणि कमी कारकीर्दीत सुशांतने मोठी फॅन फॉलोविंग कमावली आहे. सुशांतचं असं अर्ध्यावरती जाणं सगळ्यांच्याचं मनाला चटका लावून गेलं आहे. आज सुशांत आपल्यात नसला तरी सोशल मिडीया असो वा टीव्ही स्क्रीन सगळीकडे सुशांतच्या वाढदिवसाची चर्चा आहे.