Gully Boy Doori song: गरीबीतील हतबलता व्यक्त करणारे रणवीर सिंगच्या आवाजातील 'दूरी' गाणे रसिकांच्या भेटीला!
Ranveer Singh in Gully Boy Doori song (Photo Credits: YouTube)

Gully Boy Doori song: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'गली बॉय' (Gully Boy) सिनेमातील नवे गाणे 'दूरी' (Doori Song) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे रॅपसॉन्ग खुद्द रणवीर सिंगने गायले आहे. 'कोई मुझको यूं बताए, क्‍यों ये दूरी और मजबूरी' असे या गाण्याचे बोल असून 2 मिनिटे 31 सेकंदाचे हे गाणे आहे. (Gully Boy Trailer: रणवीर सिंगचा यशस्वी रॅपर होण्याचा प्रवास)

ऋषी रिचने हे गाणे संगीतबद्ध केले असून जावेद अख्तर आणि डिवाईन यांनी हे गाणे लिहिले आहे. या गाण्यात गरिबी, झोपडपट्टीतील जनजीवनाचे दर्शन होते. गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ततेसाठी पैसे आणि हिंमत दोन्हीही नाही. गरीबीतील हतबलता आणि श्रीमंत-गरीब यांच्यात असलेली दरी या गाण्यात दिसून येते.

यापूर्वी गली बॉयमधील 'असली हिप हॉप' आणि 'अपना टाईम आयेगा' ही गाणी दोन गाणी रसिकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिस आणि नावेद शेख यांच्या जीवनावर आधारीत आहे. झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.