'83' सिनेमात कपिल देव आणि रोमी भाटिया यांच्या लूकमध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोण; पहा फोटो
Ranveer Singh & Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

सध्या रणवीर सिंह (Ranveer Singh) च्या '83' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात आपल्याला रणवीर-दीपिका हे हॉट कपल पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा आगामी सिनेमा '83' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमातील दोघांचा लूक सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप आधारीत या सिनेमात रणवीर सिंह कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत असून दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया (Romi Bhatia) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियात व्हायरल होणारा फोटो अत्यंत सुंदर असून हुबेहूब कपिल देव आणि रोमी भाटिया यांचा लूक साकारण्यात दीपिका-रणवीर सह सिनेमाच्या टीमलाही यश आले आहे. ('83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो)

हा सुंदर फोटो दीपिका पदुकोण हिने शेअर केला असून यात रणवीरने भारतीय क्रिकेट कर्णधाराचा कोट परिधान केला आहे. तर दीपिका त्याचा हात धरुन हसताना दिसत आहे. '83' सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग याची जीवतोड मेहनत (Watch Video)

पहा फोटो:

या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करत असून यात आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी, सकीब सलीम, ताहिर राज भसीन आणि एमी विर्क या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'छपाक' सिनेमात दीपिका पदुकोण हिने अॅसिड हल्ला पीडितेची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. यापूर्वी दीपिका-रणवीर यांनी 'रामलीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' या सिनेमात एकत्र काम केले आहे.