'83: रणवीर सिंह ने ‘The Colonel’ दिलीप वेंगसरकर यांच्या रूपात आदिनाथ कोठारे याची करून दिली ओळख
Adinath Kothare (Photo Credits: Twitter)

Adinath Kothare As Dilip Vengsarkar: रणवीर सिंह याचा आगामी चित्रपट 83 चे फर्स्ट लूक पोस्टर सिरीज सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. या चित्रपटाचा एक नवा पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आला आहे ज्यामध्ये आपल्याला एक मराठी कलाकार पाहायला मिळत आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या रूपात आदिनाथ कोठारे आपल्याला या पोस्टरमध्ये दिसत आहे. अप्रतिम फलंदाजाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गोलंदाज दिलीप वेंगसरकर यांना ‘कर्नल’ म्हणून संबोधित केले जात असत.

निर्मात्यांनी 83 चे नवीन पोस्टर शेअर करताना दिलीप वेंगसरकर यांना ‘कर्नल’ म्हणून संबोधित करण्यात आले. हा पोस्टर शेअर करताना असे लिहिण्यात आले होते की, “त्याच्या विलक्षण फलंदाजीच्या कौशल्यामुळे परिचित, डर से तो इन्हे बॉलर्स कर्नल बुलाते हैं. पुढील डेव्हिल सादर करीत आहोत, #DilipVengsarkar! #ThisIs83.”

रणवीर सिंहनेही आपल्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “THE COLONEL!!! सादर करीत आहोत @आदिनाथकोठारे यांना दिलीप वेंगसरकर यांच्या रूपात.”

यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटातील सात पात्रांचे पोस्टर्स शेअर केले होते ज्यात निशांत दहिया, चिराग पाटील, ताहिर राज भसीन, जिवा, साकीब सलीम, जतिन सरना, हार्डी संधू, अ‍ॅमी विर्क आणि दिनकर शर्मा हे कलाकार विविध क्रिकेटपटुंच्या भूमिकेत दिसत आहेत.

'83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो

रणवीर भारतीय माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. निशांत दहिया रॉजर बिन्नीची भूमिका साकारणार आहे तर दिनकर शर्मा कीर्ती आझादच्या भूमिकेत दिसणार आहे. चिराग पाटील हा त्याचे वडील आणि माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील याची भूमिका साकारताना दिसेल. ताहिर राज भसीन सुनील गावस्करच्या रूपात दिसणार आहे. 2019 च्या सुरुवातीला सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी कलाकारांनी धरमशालामध्ये प्रशिक्षण घेतले होते.