दीपिका-रणवीर लग्नविधींना सुरुवात ; असा रंगला रणवीर सिंगचा हळदी समारंभ सोहळा (Photos)
रणवीर सिंग (Photo Credits: Manav Manglani)

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. दीपिका-रणवीर आणि प्रियंका-निक या स्टार जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दीपिका-रणवीर 14-15 नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दीपिका पदुकोणचे नंदीपूजेचे फोटोज काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर आता रणवीर सिंगच्या हळदीचे फोटोज सोशल मीडियावर हिट होत आहेत.

पाहा रणवीर सिंगच्या हळदीचे फोटोज....

 

फोटोत लग्नानिमित्त रणवीर सिंगचे घर सजलेले दिसत आहे. तर रणवीर ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. बाल्कनीमध्ये रणवीर आपल्या नातेवाईकांसह एन्जॉय करताना दिसत आहे.

 

काही दिवसांपूर्वीच दीपिकाच्या नंदीपूजेचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

14-15 नोव्हेंबरला विवाहबद्ध होत असल्याचे खुद्द दीपिका-रणवीरनेच सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. पण हा विवाहसोहळा नक्की कुठे पार पडणार, हे अद्याप कळलेले नाही. दीपिका पदुकोणने केली नंदीपूजा ; लग्नविधींना सुरुवात (Photos)