दीपिका पदुकोणने केली नंदीपूजा ; लग्नविधींना सुरुवात (Photos)
दीपिका पदुकोण (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 14-15 नोव्हेंबरला दोघेही विवाहबद्ध होतील. त्यापूर्वी दीपिका कामातून ब्रेक घेत लग्नाच्या तयारीला लागली आहे. अलिकडेच दीपिकाने लग्नातील पहिली विधी पूर्ण केली आहे. दीपिकाने लग्नापूर्वी नंदीपूजा केली. या विधीचे फोटोजही इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटोज जबरदस्त व्हायरल होत आहेत. या फोटोत दीपिका ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

दीपिकाची हेअर स्टायलिंग टीम मेंबर शालीन नथनीने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत दीपिका अगदी फ्रेश, आनंदी आणि सुंदर दिसत आहे.

रणवीर दीपिका इटलीत विवाहबद्ध होतील, असे बोलले जात आहे. विवाहसोहळ्यात फक्त खास मंडळींनाच आमंत्रित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

To new beginnings @deepikapadukone

A post shared by Shaleena Nathani (@shaleenanathani) on

 

View this post on Instagram

 

#bridetobe #deepikapadukone #photooftheday #instalove #instalike #movies #smile #ranveersingh #mumbai #india

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 

रणवीर-दीपिकाच्या विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. हा सोहळा ही अगदी शाही असेल, यात काही वाद नाही.